शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2020 (08:16 IST)

अखिल विश्व गायत्री परिवाराकडून १०० देशामध्ये यज्ञाचे आयोजन

अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने येत्या ३१ मे ला कोरोनासह इतर विषाणू, हानिकारक जीवाणू आणि सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठी जगातील तब्बल १०० देशामध्ये यज्ञ केले जाणार आहेत. तसेच वातावरण स्वच्छ करण्यासाठी गायत्री मंत्र, सूर्य गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र यांच्यासह हवन यज्ञ केले जाणार असून जगातील १०० पेक्षा जास्त देशांमधील लाखो लोक हे यज्ञ त्यांच्या घरात करणार आहेत. विशेष म्हणजे हे यज्ञ चौथ्या लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मे रोजी केले जाणार आहे.
 
गायत्री कुटुंबातील सदस्य दीनानाथ सिंह यांनी सांगितले की, ३१ मे रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी ५ या दरम्यान जगभरातील गायत्री कुटुंबातील कोट्यावधी लोक एकत्रितपणे हा यज्ञ करणार आहेत. दरम्यान, जागातील साथीच्या आजारांना सामोरे जाण्यासाठी ते त्यांच्या घरी २४ वेळा गायत्री मंत्र, पाच वेळा सूर्य गायत्री मंत्र आणि पाच वेळा महामृत्युंजय मंत्राचे पठण करतील. तसेच १ जून रोजी ‘गायत्री माँ’चा प्रकट दिन असल्यामुळे या यज्ञाचे एक दिवस आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात शहरातील किमान ५५१ कुटुंबे सहभागी होणार आहेत.
 
हवन कसे करायचे? त्याकरता कोणता श्लोक बोलायचा? कोणत्या साहित्याचे वापर करायचे याबाबत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच याकरता एक अॅप देखील तयार केले जात आहे.