शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

लहान मुलीसोबत अशी नाचली सुष्मिता, व्हिडिओ झाला viral

sushmita sen
अभिनेत्री आणि माजी मिस यूनिवर्स सुष्मिता सेन आपल्या दोन्ही मुलींसोबत फार इन्जॉय करताना दिसत आहे. सुष्मिताने इंस्टाग्रामवर आपल्या धाकट्या मुलीसोबत एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत दोन्ही एड शीरनच्या शेप ऑफ यू गाण्यावर डांस करत आहे.  
 
व्हिडिओ शेअर करत सुष्मिताने लिहिले आहे, 'जेव्हा ही तुम्हाला बसून वेळ घालवायचा आणि डांस करण्याबद्दल एकाची निवड करायची असेल तर तुम्ही नक्कीच डांसची निवड कराल.' 
 
या व्हिडिओत सुष्मिताची धाकटी मुलगी अलिसाह फारच क्यूट डांस करत आहे. हा व्हिडिओ सुष्मिताच्या बीचसाइड वेकेशन वीडियोजचा एक मोंटाज आहे त्यात तिची मोठी मुलगी रेनी दिसत आहे.  
 
सांगायचे म्हणजे बर्‍याच वेळेपासून सुष्मिता सेन मोठ्या पडद्याहून दूर आहे. ती शेवटी अनिल कपूरच्या प्रॉडक्शनचे चित्रपट 'नो प्रॉब्लम'मध्ये दिसली होती.