गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (14:53 IST)

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दयाबेन तारक मेहतामध्ये लवकर येणार

तारक मेहता का उलटा चष्मा एक लोकप्रिय मालिका असून तिने अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या घरात आणि मनात घर केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही  मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत दयाबेन लवकर येणार अशी चर्चा सुरु असताना दयाबेनच्या येणाची वेळ आता जाहीर झाली आहे. 

मालिकेच्या एका भागात दयाचा भाऊ सुंदर हा मुंबईत आला असून त्याने जेठालालच नाही तर अवघ्या गोकुळधाम मध्ये सर्वांची झोप मोडली आहे. 

सुंदर ची मुंबईत एंट्री झाल्यावर जेठा त्याला दया कधी येणार असं विचारतो.पण सुंदरने काहीही उत्तर न देता विषयच बदलला. सुंदर कडून दया कधी परत येणार हे वदवून घेण्यासाठी तारक मेहतांची मदत घेतली आणि तारक मेहताने सुंदरला जेठालाल पुन्हा लग्न करणार अशी माहिती दिली. 

जेठालाल पुन्हा दुसरं लग्न करणार ही माहिती मिळाल्यावर सुंदर जेठाची समजूत काढण्यासाठी येतो. तर सुंदरला सगळे गोकुळधाम वासी दयाबेन कधी येणार असे विचारतात. यावर सुंदर यंदाच्या दिवाळीला बेहना परत येणार आणि आपल्या हातूनच दाराशी दिवे लावणार असे मी शपथ घेऊन सांगतो. त्याने असं सांगितल्यावर सगळे आनंदी  होतात. आणि आनंदाने गरबा खेळू लागतात. 
 
Edited by - Priya Dixit