सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated :मुंबई , शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (15:23 IST)

है सनननन! अखेर दया बेन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये परतणार; जुनी की नवी?

daya ben
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’या अतिशय लोकप्रिय मालिकेचे लाखो चाहते आहेत. सहाजिकच या मालिकांमधील कलाकार लोकप्रिय आहेत. एखाद्या कलाकाराने मालिका सोडली किंवा त्याचे पुनरागमन झाले तर त्याची लगेच चर्चा सुरू होते. सध्या देखील अशीच एका कलाकारांविषयी चर्चा सुरू आहे.
 
कलाकार शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो सोडला. तेव्हा अनेकांना मोठा झटका बसला. दरम्यान, ‘तारक मेहता’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. शोमधील प्रसिद्ध पात्र दया बेन पुनरागमन करणार आहे. बऱ्याच दिवसांपासून दया बेनच्या पुनरागमनाबद्दल अनेक अंदाज बांधल्या जात होते, मात्र चाहत्यांना पुन्हा निराश व्हावे लागले होते. ‘तारक मेहता’मध्ये जेठालाल आणि दया यांचे भांडण पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
 
असित मोदी यांनी सांगितले की, कोणत्याही चांगल्या वेळी दया बेनला प्रेक्षकांसमोर आणले जाईल. ‘आमच्याकडे दया बेनचे पात्र परत न आणण्याचे कोणतेही कारण नाही. मागील काही काळ आपल्या सर्वांसाठी कठीण गेले आहेत. आता परिस्थिती थोडी चांगली झाली आहे. सन 2022 मध्ये कोणत्याही चांगल्या वेळी आम्ही दया बेनचे पात्र परत आणणार आहोत. जेठालाल आणि दया भाभी यांचे मनोरंजन प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
 
दिशा वाकाणी दया बेनची भूमिका करणार काय? या प्रश्नावर असित मोदी म्हणाले, ‘दिशा वाकानी दया बेनच्या भूमिकेत परतणार हे मला माहीत नाही. दिशा जीसोबत आमचे अजूनही चांगले संबंध आहेत. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. आता तिचे लग्न झाले असून तिला एक मूल आहे. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात आणि जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतो. आपल्या सर्वांचे स्वतःचे जीवन आहे. मला यावर काहीही बोलायचे नाही पण दिशा बेन किंवा निशा बेन काहीही असो पण दया बेन नक्कीच परततील.