बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified मंगळवार, 24 मे 2022 (11:19 IST)

शूटिंग दरम्यान विजय देवरकोंडा-सामंथा रूथचा अपघात

साउथ स्टार समंथा रुथ आणि विजय देवरकोंडा सध्या चर्चेत आहेत. विशेष म्हणजे साऊथचे सुपरस्टार लवकरच 'कुशी' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, समंथा आणि विजय देवरकोंडा यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
 
सध्या हे स्टार्स त्यांच्या 'कुशी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा आणि विजयचा अपघात झाला. सामंथा आणि विजय काश्मीरमधील पहलगाम भागात स्टंट सीन करत होते.या दरम्यान एक अवघड सीन करताना त्यांचा अपघात होऊन त्यांना दुखापत झाली, तो 
 
त्यांना एका सीन मध्ये लिद्दर नदीच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या दोरीवरून वाहन चालवायचे होते, परंतु दुर्दैवाने वाहन पाण्यात पडले आणि दोघांच्या पाठीला दुखापत झाली. मात्र, अपघातानंतर लगेचच.त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

या अपघातानंतर समंथा आणि विजय रविवारी शूटिंगला परतले. यावेळी त्यांना श्रीनगरच्या डल सरोवरावर शूटिंग करायचं होतं, पण शूटिंगदरम्यान दोघांनाही पाठदुखीचा खूप त्रास झाला होता. मात्र, काश्मीर शेड्यूल पूर्ण करून 'कुशी'ची संपूर्ण टीम परत आली आहे.

हा चित्रपट 23 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.