सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 3 जून 2024 (14:54 IST)

तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना यांचा हॉरर-कॉमेडी ‘अरनमानाई 4’ होणार OTT वर रिलीज

ठरलं तर तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना यांचा हॉरर-कॉमेडी ‘अरनमानाई 4’ होणार OTT वर रिलीज ! 
 
संपूर्ण भारतातील स्टार तमन्ना भाटिया आणि अष्टपैलू पॉवरहाऊस अभिनेत्री राशि खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अरनमानाई 4’ लवकरच OTT वर रिलीज होणार आहे. रविवारी Disney+ Hotstar ने घोषणा केली की Aranmanai 4 "लवकरच" प्लॅटफॉर्मवर येत आहे. 

हॉरर-कॉमेडी तमिळ व्यतिरिक्त तेलुगु, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध असेल. तथापि, अधिकृत प्रीमियरची तारीख अद्याप समोर आलेली नाही. नुकताच हिंदी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 2024 चा पहिला तमिळ ब्लॉकबस्टर म्हणून जगभरात रु. 100 कोटी कलेक्शन केलं. तमन्नाचा हा वर्षातील पहिला चित्रपट आहे. 
 
तमन्ना आणि राशी सोबत‘अरनमानाई 4’ मध्ये सुंदर सी, कोवई सरला, योगी बाबू, वेनेला किशोर, श्रीनिवास रेड्डी, सुनील आणि केएस रविकुमार यांच्यासह स्टार-स्टडेड कलाकार आहेत. सुंदर सी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांनी अवनी सिनेमॅक्स आणि बेन्झ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली केली होती.