गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (14:00 IST)

विमान अपघातात टार्झन अभिनेता Joe Laraचा यांच्यासह 7 जणांचा मृत्यू

'टार्जन : द एपिक ए डव्हेंचर' मध्ये टार्झनची भूमिका करणारा अभिनेता विल्यम जो लारा यांचे विमान अपघातात निधन झाले. शनिवारी झालेल्या अपघातात अभिनेत्याच्या पत्नीसह इतर पाच जणांचा मृत्यूही झाला आहे. असे सांगितले जात आहे की, हे इतर 6 लोक जो याच्या समवेत एका छोट्या जेटमधून प्रवास करत होते आणि त्याचवेळी हे प्लेन क्रॅश होऊन नॅशविलेजवळील टेनेसी लेकमध्ये कोसळले. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.   
 
रिपोर्ट्सनुसार, पोलीस जो यांच्यासह इतर सहा जणांच्या मृतदेहांचा अद्याप शोध घेत आहेत. रविवारी रदरफोर्ड काउंटी फायर रेस्क्यूचे कॅप्टन जॉन इंगल यांनी निवेदन दिले की, smyrna जवळील पर्सी प्रिस्ट तलावाजवळ पोलिसांची शोध मोहीम सुरु आहे. ते म्हणाले की, दुर्घटनाग्रस्त विमान जेथे कोसळले त्या तलावाच्या सभोवतालच्या भागात देखील चौकशी केली जात आहे.
 
विमान अपघातात ‘हे’ पडले मृत्युमुखी
शनिवारी विमान अपघातात ठार झालेल्यांची ओळख जाहीर करण्यात आली. यामध्ये ब्रॅंडन हॅना, ग्वेन एस लारा, विल्यम जे. लारा, डेव्हिड एल मार्टिन, जेनिफर जे. मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जोनाथन वॉल्टर्स हे लोक मृत्युमुखी पडले आहेत. हे सर्व जण टेनेसी येथील ब्रेंटवुडचे होते.
 
‘टार्झन’ ही एक अमेरिकन ड्रामा सीरीज होती, ज्याचा एक हंगाम 1996 ते 1997 दरम्यान प्रसारित झाला होता. या मालिकेत टार्झनच्या जंगल सफारीमधून मानवी संस्कृती आणि लग्नात पर्यंत पोहचण्याचा प्रवास दाखवण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी रिसॉर्ट येथे या सीरीजचे चित्रीकरण करण्यात आले होते. 
 
जो लाराचा जन्म 2 ऑक्टोबर 1962 रोजी सॅन डिएगो येथे झाला होता. त्याने मॉडेलिंगद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली आणि त्यानंतर त्याला ‘टार्झन’मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. जोने 1996 ते 1997 दरम्यान प्रदर्शित झालेल्या टार्झन सीरीजच्या 22 भागांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. जोने ‘टार्झन’ व्यतिरिक्त ‘अमेरिकन सायबोर्ग स्टील वॉरीअर’, ‘स्टील फ्रंटियर’, ‘वॉरहेड’, ‘डूम्सडे’ हे चित्रपट आणि ‘बेवॉच’, ‘कोनान द अॅ डव्हेंचरर’ या टीव्ही कार्यक्रमात काम केले होते. तो शेवट ‘समर ऑफ 67’ या चित्रपटात झळकला होता.