शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2017 (17:30 IST)

पुन्हा एकदा ‘हम पाँच फिर से’

गेल्या काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील ‘हम पाँच’ ही मालिका आता पुन्हा एकदा   नव्या रूपात येणार आहे. ‘हम पाँच फिर से’ असं या मालिकेचं नाव असणार आहे.  या तिसऱ्या सिझनची निर्मिती  ‘एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स’ करणार आहे.  यावेळी मालिकेला एक मॉडर्न टच देण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. 1995 आणि 2005 मध्ये प्रचंड गाजणाऱ्या या मालिकेचं नवीन रूप कसं असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.  मागील सिझनमध्ये अशोक सराफ यांनी आनंद माथूर यांची भूमिका साकारली होती. ती भूमिका आता अभिनेता सूरज थापर साकारणार आहे. तर आनंद माथूर यांच्या पत्नीची भूमिका बैष्णकी महंत साकारणार आहे. आधी ही भूमिका प्रिया तेंडुलकर यांनी साकारली होती. तर दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत  सीमा पांडे दिसतील. काजल भाईच्या भूमिकेत जयश्री व्यंकटरामनन दिसणार आहे. विद्या बालनने बजावलेली राधिकाची भूमिका आता नव्या सिझनमध्ये अंबालिका सप्रा साकारणार आहे.