1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (08:13 IST)

तेलुगू अभिनेता नंदामुरी तारक रत्न यांचं 39 व्या वर्षी हृदयविकाराने निधन

nandamuri
तेलुगू अभिनेता नंदामुरी तारक रत्न यांचं बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. गेल्या महिन्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
 
39 वर्षीय तारक रत्न हे ज्युनिअर एनटीआर यांचे चुलत भाऊ आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे नातू होते.
 
त्यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नंदामुरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
ते म्हणतात, "नंदामुरी तारक यांच्या अकाली जाण्याने दु:ख झालं आहे. त्यांनी चित्रपट आणि करमणुकीच्या क्षेत्रात त्यांनी ओळख निर्माण केली होती. या कठीणसमयी त्यांच्या कुटुंबियांबरोबर आणि चाहत्यांबरोबकर माझ्या सहवेदना आहेत. ओम शांती."
 
कर्नाटकचे आरोग्य मंत्री आणि भाजप नेते डॉ. के.सुधाकर यांनीही ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.
 
तेलुगू सुपरस्टार महेश बाबू लिहितात, "तारक रत्न यांच्या अचानक जाण्याने मी अतिशय दु:खी आहे. फार लवकर निघून गेलास भावा.. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाबरोबर आहेत.
 
चित्रपट अभिनेता अल्लू अर्जून ने ही ट्विट केलं आहे. "तारक रत्न यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं. त्यांच्या कुटुंबियाप्रति मी संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो."
 
अभिनेता चिरंजीवी यांनीही ट्विट केलं आहे. "तारक रत्न यांच्याविषयी ऐकून फार वाईट वाटलं. इतका प्रतिभावंत, युवा अभिनेता, फार लवकर आपल्यातून निघून गेला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो."