1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified गुरूवार, 25 मे 2023 (08:13 IST)

नुकताच ‘असुर’च्या दुसऱ्या सीझनचा फर्स्ट लूक समोर आला

asur
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘असुर’ या वेब सीरिजची चांगलीच चर्चा झाली. सुरुवातीला या सिरिजला तसा थंड प्रतिसाद होता, पण नंतर हळूहळू ही वेबसीरिज प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली.
 
सायको थ्रिलर या पठडीत मोडणारी अशी कथा तोवर कुणीच पाहिली नव्हती. तेव्हापासून या सिरिजच्या पुढच्या सीझनची चाहते आतुरतेने वाट बघत होते. अर्शद वारसी आणि बरुण सोबती या दोन्ही अभिनेत्यांच्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली. आता मात्र ही प्रतीक्षा संपली आहे कारण लवकरच ‘असुर’चा सीझन २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
नुकताच ‘असुर’च्या दुसऱ्या सीझनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यात हे नाट्य आणखी एका वेगळ्या आणि भयानक वळणावर येऊन थांबलंय आणि या दुनियेत आणखी एका असुराची एन्ट्री होणार असे संकेत देण्यात आले आहेत. हा अजून एक असुर कोण आणि त्याला रोखण्यात यश मिळणार का? याचं उत्तर मात्र तुम्हाला सीरिजमध्येच मिळणार आहे.
 
‘असुर’चा हा दूसरा सीझन जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १ जूनपासून मोफत बघायला मिळणार आहे. या नव्या सीझनमध्ये बरुण सोबती, अर्शद वारसी, रिद्धी डोग्रा, अनुप्रिया गोएंका, अमेय वाघ हे कलाकार पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor