सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (13:11 IST)

द केरळ स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मा लग्न करणार!

Adah Sharma
द केरळ स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्माला 'द केरळ स्टोरी मुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती नेहमी सोशलमिडीयावर सक्रिय असते. सध्या ती तिच्या एका पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या पोस्टवर चाह्त्ये लाईक्स आणि कॉमेंट्स करत आहे . 

अलीकडील अदाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता त्यात ती बंदूक घेऊन निशाणा लावताना दिसत आहे. त्यात तिने 'अदा का स्वयंवर' असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहे. तिने योग्य व्यक्ती नाही तर योग्य बंदूक निवडत आहे असं लिहिले आहे. 
 
अदा लवकरच एका वेब सिरीज मध्ये झळकणार आहे.सध्या ती दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि निर्माता विपुल शाह यांच्यासोबत 'बस्तर ' चित्रपटाच्या शुटिंग मध्ये व्यस्त आहे. हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे.

Edited by - Priya Dixit