शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (15:33 IST)

चित्रपट 'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या बहुप्रतीक्षित ट्रेलरचे अनावरण!

नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टर आणि गाण्यानंतर, 'अंतिम'च्या निर्मात्यांनी उत्साही दर्शकांसाठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. आज प्रदर्शित करण्यात आलेला ट्रेलर 'अंतिम दुनिया'ची सर्वात मोठी झलक आहे. ट्रेलरमध्ये पंपिंग एक्शन, हाई-ऑक्टेन बैकग्राउंड म्यूजिक आणि खूप काही आहे जे प्रेक्षकांना चित्रपटाविषयी अधिक उत्साहित करेल.  
 
सलमान आणि आयुषने एकत्र येऊन आपल्या चाहत्यांसाठी ट्रेलरचे अनावरण केले असून तिथे उपस्थित प्रेक्षकांच्या त्याला जबरदस्त ऊर्जावान प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. ट्रेलरला मुंबईसोबतच इंदौर, गुरुग्राम आणि नागपुर येथे एकाच वेळी रिलीज करण्यात आले. हा इवेंट सध्याच्या दिवसातील कोणत्याही बॉलीवुड चित्रपटासाठी लॉन्च करण्यात आलेला सर्वात मोठा ट्रेलर सिद्ध झाला आहे.
 
ट्रेलर पाहिल्यानंतर इतके तर नक्कीच आहे की चित्रपटाच्या चाहत्यांसाठी खूप काही धमाकेदार होणार आहे.
 
ट्रेलरमध्ये कथेतील पात्रे आणि कथेचे जग उत्तम प्रकारे मांडण्यात आले आहे. चित्रपटात त्यांची भूमिका साकारण्यासाठी सलमान आणि आयुष दोघांनाही लक्षणीय शारीरिक ट्रान्सफॉर्मेशन करावे लागले आणि ते ट्रेलरमध्ये उत्तमरीतीने दिसून येत आहे. रोमहर्षक ऍक्शन-पॅक ट्रेलरमध्ये, सलमान खान एका डॅशिंग, पोलिसाची भूमिका साकारत आहे जो गुन्हा रोकण्यासाठी काहीही करू शकतो. सलमान कमालीचा उत्साही आणि दृढनिश्चयी दिसत असून सरदारच्या पोशाखात पाहणे आनंददायी ठरेल, जे त्याने यापूर्वी कधीही साकारलेले नाही. ट्रेलरमध्ये आयुषच्या व्यक्तिरेखेतील परिवर्तनाची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चित्रपटातील एका निष्पाप तरुण मुलापासून ते सर्वात आक्रमक, भयंकर आणि प्रादेशिक गुंडांपैकी एक असा आयुषचा प्रवास अविश्वसनीय आहे जो चित्रपटात पाहणे मनोरंजक असेल.
 
ट्रेलरमध्ये बैकग्राउंड म्यूजिकची झलक पाहिल्यानंतर, आता याची खात्री आहे कि दर्शकांना संपूर्ण चित्रपटादरम्यान चार्टबस्टर म्यूजिक ऐकायला मिळणार आहे.
 
'अंतिम' महिमा मकवानाचा पहिला चित्रपट असून तिने आपल्या ग्रेसफुल अभिनयाने सर्वांनाच चकित केले आहे. 'अंतिम'च्या दिग्दर्शकाच्या खुर्चीत महेश मांजरेकर आपल्या कम्फर्ट झोनमध्ये पूर्णपणे फिट बसले आहेत.  या आधी देखील आपण त्यांची दिग्दर्शकीय तंत्रावरची पकड पाहिली आहे आणि आता 'अंतिम'मध्ये पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या रूपात त्यांचे प्रभुत्व और कौशल्य अनुभवणार आहोत. महेश मांजरेकर यांची देखील या चित्रपटात छोटिशी मात्र महत्वपूर्ण भूमिका आहे.
 
हा चित्रपट 26 नोव्हेंबरला झी स्टूडियोज द्वारा थिएटर्समध्ये ग्लोबली प्रदर्शित होणार आहे.  
 
सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर  यांनी केले आहे. हा चित्रपट सलमा खान द्वारे निर्मित आणि सलमान खान फिल्म्स द्वारे प्रस्तुत करण्यात आला आहे.