बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (11:29 IST)

कॉमेडी किंग' लक्ष्मीकांत बेर्डे वाढदिवस विशेष: लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमानखान सोबत पदार्पण केले होते

फोटो साभार -सोशल मीडिया 
कॉमेडी किंग' लक्ष्मीकांत बेर्डे यांचा वाढदिवस आहे. आज जरी ते  या जगात नसले तरी त्यांचा उत्तम अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. त्यांचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहित चित्रपट दिले आहे. चित्रपटसृष्टीतील कॉमेडी किंग म्हणून त्यांची ओळख आहे. मराठी चित्रपटात आपली उत्तम कारकिर्दी दिल्यावर ते हिंदी चित्रपटाकडे वळले आणि सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले. 
सलमान खान आणि लक्ष्मीकांत यांची जोडी त्यावेळी चित्रपसृष्टीतील सुपरहिट जोडी ठरली. या दोघांनी 'मैने प्यार किया' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाला प्रेक्षांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या नंतर या जोडीने 'हम आपके है कौन' साजन सारखे हिट चित्रपट दिले. आणि लक्ष्मीकांत हे हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात शिरले. 
लक्ष्मीकांत यांचे फार कमी वयातच निधन झाले. ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या वर उपचार देखील सुरु होते. 2004 साली लक्ष्मीकांत यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने लाखो प्रेक्षकांना धक्का बसला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून सलमान दुखी झाला. लक्ष्मीकांत सारखा हरहुन्नरी कलाकार दुसरा होणं शक्य नाही.