मराठीतील गझलकार इलाही जमादार यांचे निधन
कविवर्य सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलेला शिखरावर नेणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार (७५) यांची वृद्धापकाळाने प्राणज्योत मालवली. त्यांनी जीवनातील प्रत्येक भावना शब्दबद्ध केल्या आहेत.जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी झाला सांगलीतील दुधगाव येथे झाला होता. जमादार यांनी १९६४ पासून काव्यलेखन सुरू केलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी कार्यक्रम केले. मराठी, हिंदी, उर्दू आदी दैनिकं आणि मासिकांसाठी इलाही जमादार यांनी कविता व गझल लिहिल्या.
नवोदित कवींसाठी इलाही गझल क्लिनिक नावाची गझल कार्यशाळाही घ्यायचे. सुरेश भट यांच्यानंतर इलाहींनी मराठी गझलेला उत्तुंगतेच्या शिखरावर नेलं. जुलै २०२० मध्ये ते तोल जाऊन पडले होते. यावेळी त्यांना जबर मार लागला होता. त्यातच वाढत्या वयामुळे त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रासही सुरू झाला होता.