शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (12:46 IST)

प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे कालवश

प्रख्यात मराठी लेखिका आणि आर्चार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे आज निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती राजेंद्र पै यांनी दिली.
मीना देशपांडे यांची साहित्य संपदा
 
आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८)
पपा - एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)
मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित कादंबरी)
मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)
ये तारुण्या ये (कथासंग्रह)
हुतात्मा (कादंबरी)