शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (09:32 IST)

फिरायला निघालेल्या आई-मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केला, वाचा पुढे काय झाले

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी फिरायला निघालेल्या निघालेल्या आई-मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात बिबट्याने मुलीवर झडप घालून उचलून नेले होते. त्यानंतर शोधाशोध केली असता ही चिमुरडी एका झुडपात आढळली. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलेलं आहे. 
 
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या गजबजलेल्या पर्यावरण चौकात बिबट्याच्या हल्ल्याची ही घटना घडली आहे. संध्याकाळी फिरायला निघालेल्या निघालेल्या आई-मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी आईच्या डोळ्यासमोर बिबट्याने 5 वर्षाच्या चिमुरडीला उचलून आजूबाजूच्या जंगलातील झुडपांमध्ये धूम ठोकली होती. आरडाओरडा करुन गर्दी एकत्र झाल्यावर झुडपी जंगलात मुलीचा शोध घेण्यात आला होता. या दरम्यान नागरिकांना जखमी अवस्थेतील अर्धमेली चिमुकली आढळली आहे.
 
मुलीला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिला रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरानी जखमी चिमुरडीला मृत घोषित केले. भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात सीआयएसएफ (CISF) जवानाच्या मुलीच्या मृत्यूने प्रशासन हादरलेलं आहे. लावण्या उमाशंकर दांडेकर असं चिमुरडीचं नाव आहे. वनविभागाने या परिसरात सध्या बंदोबस्त लावलेला आहे.