गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 18 जानेवारी 2020 (15:31 IST)

सरकार 5 वर्षं चालवायचंय- पवारांचा संजय राऊतांना सल्ला

उदयनराजे यांना ते शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणे, 'मी दाऊदला दम दिला होता', 'करीम लाला याला भेटायला इंदिरा गांधी पायधुणीला यायच्या', अशी काही विधानं केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत वादात सापडले आहेत.
 
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना विचारलं असता, "मी या विधानापासून दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होतं," असं ते म्हणाले.  
 
"यानंतर त्यांनी अस्वस्थता निर्माण करणारं वक्तव्य करू नये अशी सूचना मी करणार नाही, सगळे शहाणे आहेत. सरकार 5 वर्षं चालवायचं आहे. काँग्रेस याबाबतीत व्यवहारी आहे," असा सूचक इशाराही त्यांनी केला.