५५ वर्षाहून अधिक वय असलेल्या पोलिसांना भरपगारी सुट्टी
राज्यात पोलिसांवरील कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने ५० ते ५५ वर्षांदरम्यान असलेल्या पोलिसांना नॉर्मल ड्युटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर ५५ वर्षाहून अधिक वय असलेल्या पोलिसांना भरपगारी सुट्टी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली आहे. बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असतानाच राज्यभरात आजपर्यंत ३ हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तसेच अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.त्याचप्रमाणे राज्यभरातील कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांनाही कोणाची लागण होत असल्याने राज्य सरकारने तातडीने आणखीन ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपातील पॅरोलवर घरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत राज्यातील कोरण्याचा प्रादुर्भाव झालेल्या पोलिसांची संख्या तीन हजारांच्या घरात पोचली आहे. त्यामध्ये २०० पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तर २८०० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.