1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Improve your behavior, father's question angered daughter, boiling oil thrown on father

धक्कादायक! तुझ्या वागणुकीत सुधारणा कर, वडिलांच्या प्रश्नाने मुलीचा संताप, उकळतं तेल वडिलांवर फेकलं

भंडाऱ्यात एका संतापलेल्या मुलीने जन्मदात्यावर उकळते तेल टाकलेले आहे. त्यामुळे तिचे वडील 40 टक्के भाजलेले आहेत. मुलीने रागाच्या भरात कढईतील उकळते तेल वडिलांच्या अंगावर ओतले आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील चिचगांवात ही घटना घडली आहे. या घटनेत तिचे वडील मनोज महादेव रामटेके (47) 40 टक्के भाजलेले आहेत. त्यांच्यावर भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.
 
मनोज रामटेके यांच्या 25 वर्षीय मुलीने 3 वर्षापूर्वी जवळच्या गावातील युवकासोबत प्रेमविवाह केलेला होता. तेव्हापासून ती पतीसोबत त्याच्या गावी राहत होती. पण त्यानंतर घरगुती कारणामुळे दोघांमध्ये वादविवाद निर्माण झाले होते. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून ती माहेरी परत आलेली होती. मात्र रात्र तिचे आणि वडिलांसोबत भांडण झाले होते. त्या भांडणादरम्यान तिच्या वडिलांनी तिला प्रेमविवाह केल्यानंतर पतीला का सोडले? तुझ्या वागणुकीत सुधारणा कर, असे म्हटलेलं होत.
 
यावरुन संतापलेल्या मुलीने वडिलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कढईतील उकळते तेल टाकले आहे. यात वडिलांचे डोके, संपूर्ण चेहरा, मान, छातीचा भाग, पाठ आणि दोन्ही खांदे असा  भाग जळला आहे. या घटनेनंतर ती मुलगी पळून गेली होती. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलीचा शोध सुरु केलेला आहे. 
पुढील लेख
शुल्क भरण्यासाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई होणार