संबंधित माहिती
- आयएसआयला लढाऊ विमानांची तांत्रिक माहिती पुरवणारा गजाआड
- मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची डेडलाईन सहा महिने पुढे गेली
- बाप्परे, सरकारला बदनाम करण्यासाठी विविध सोशल मीडिया साईटवर ८० हजार फेक अकाऊंट उघडली
- मुंबई पोलिसांविरोधात ठरवून मोहिम चालवली गेली : पोलीस आयुक्त परमबीर सिंह
- स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा संजय राऊत यांची मुलाखत घेणार
मराठीत बोलण्यास दिला नकार, लेखिका शोभा देशपांडे यांचे दुकानासमोर ठिय्या आंदोलन
कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सने मराठीत बोलण्यास नकार देत मराठी लेखिका शोभा देशपांडे यांना दुकानातून ढकलून दिले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी मराठीच्या अस्मितेसाठी लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानासमोरच ठिय्या आंदोलन केले. रात्रभर दुकानासमोर आंदोलनाला एकट्या बसून होत्या. त्यानंतर त्यांच्या मदतीला शुक्रवारी सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे हे कार्यकर्त्यांसह धावून आले. अखेर या मुजोर ज्वेअर्सने मनसेच्या दणक्यानंतर लेखिका शोभा देशपांडे यांची पाय पकडून मराठीत बोलून माफी मागितली आहे.
माध्यमांशी बोलताना ज्वेअर्सचा मालक म्हणाला की, मला मराठी थोडे येते. मुंबईतच माझा जन्म झाला आहे. मी महाराष्ट्रीयन आहे. मला माफ करा, असं म्हणतं त्यांने शोभा देशापांडे यांची पाय पकडून माफी मागितली आहे. २० तासांपासून शोभा देशपांडे एक पाण्याची बॉटल आणि चार मराठीची पुस्तके घेऊन आंदोलन करत होत्या.
