सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (09:38 IST)

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा संजय राऊत यांची मुलाखत घेणार

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा राजकीय वर्तुळात शिवसेना शैलीत शाब्दीक फटकेबाजी करणाऱ्या संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहे. ज्या निमित्तानं कुणालनं नुकतीच राऊतांची भेटही घेतली. 'Shut up ya Kunal 2.0', असं कॅप्शन लिहित खुद्द कुणाल कामरा यानंच या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.   
 
कुणाल कामरा याच्या स्टँडअप कॉमेडी सीरिजचं दुसरं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या सीरिजच्या सुरवातीलाच शिवसेना नेते संजय राऊत यांची मुलाखत कुणाल कामरा घेणार  आहे. या कारणासाठीच त्यानं ही भेट घेतल्याची माहीती मिळत आहे. कुणालनं यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि प्रसिद्ध संपादक रविश कुमार यांचीही मुलाखत घेतली आहे.