शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (18:18 IST)

वेळ आल्यास मराठा आरक्षणासाठी तलावारीही काढू : संभाजीराजे

वेळ आल्यास मराठा आरक्षणासाठी तलावारीही काढू असा इशारा आता खासदार संभाजीराजेंनी दिला आहे. संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहित आहे.  आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत. आम्हाला गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. येत्या १५ तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. 
 
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत असं दिसून येतं आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयही नाही असाही आरोप संभाजी राजेंनी केला आहे. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका. आम्ही दिल्लीला येण्यासाठीही घाबरणार नाही अशा शब्दात केंद्र सरकारने राज्य व केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. राज्यात होणारी आंदोलनं ही भाजपा पुरस्कृत नाहीत असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.