गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (08:22 IST)

मराठा आरक्षण आंदोलन, येत्या 7 तारखेला महत्वाची बैठक

नवी मुंबईमध्ये 7 तारखेला मराठा समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होत आहे. तुर्भेतल्या माथाडी भवनात ही बैठक बोलावण्यात आली आहे. 
 
मराठा संघटनांच्या सर्व संघटना, प्रतिनिधींना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. समाजाच्या पुढील आंदोलनाची दिशा नेमकी काय असावी याबाबतीत या बैठकीत चर्चा होणार आहे. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.
 
तत्पूर्वी मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांची फौज या लढ्यात असली पाहिजे, वकिलांनी यामध्ये  पुढाकार घ्यावा, असं मत संभाजीराजे यांनी मांडलंय.
 
संभाजीराजे यांनी मराठा समाजाला EWS मधून आरक्षण नको, अशी भूमिका याअगोदर जाहीर केलीये. EWS आरक्षणाचे समर्थन करणारे पुढे काही धोका झाल्यास जबाबदारी घेणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.