मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (17:05 IST)

क्रिकेट विश्व कप जिंकण्याच्या घटनेला 37 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चित्रपट ’83 च्या निर्मात्यांनी टीम इंडियाचे केले अभिनंदन !

2020 चा सर्वात मोठा चित्रपट असल्याकारणाने सगळ्यांच्या नजरा एप्रिल महिन्यातील ‘83 च्या प्रदर्शनावर लागल्या होत्या मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. या मल्टीस्टारर चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह कपिल देव यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक कबीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट 1983 मध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवलेल्या क्रिकेट विश्व कप जिंकण्याच्या ऐतिहासिक घटनेवर हा चित्रपट असून आतापर्यंतची सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपट आहे.
 
रिलायंस एंटरटेनमेंट आणि फैंटम फिल्म्स द्वारा निर्मित ‘83, कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनचा हा चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फैंटम फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट आणि ‘83 फिल्म लिमिटेड द्वारे आणि दिग्दर्शन कबीर खान यांच्या द्वारे करण्यात आले आहे. रिलायंस एंटरटेनमेंट आणि पीवीआर पिक्चर्स द्वारे हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे.