बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (10:08 IST)

पुन्हा एकदा ‘रेहना है तेरे दिल मै’

‘रेहना है तेरे दिल मै’या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिक्वेल आणण्याची तयारी सुरु केली आहे. याच चित्रपटामुळे दक्षिणेत प्रसिद्ध असणाऱ्या आर. माधवन आणि दिया मिर्झाला नवीन ओळख मिळाली.त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना माधवन मॅडीच्या तर दिया रिनाच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
“मागील अनेक वर्षांपासून चित्रपटाचे निर्माते वेगवेगळ्या गोष्टींवरुन सिक्वेलबद्दल विचार विनियम करत होते. नुकतीच सर्वांच्या पसंतीने एक कथा निवडण्यात आली आहे. सर्वांना स्क्रीप्ट आवडले आहे. यामध्ये मॅडी आणि रिनाच्या आयुष्यात लग्नानंतर काय होतं यासंदर्भातील कथा पहायला मिळेल. मात्र स्क्रीप्टसंदर्भातील काही बदल करुन अंतीम टप्प्यातील काम सुरु आहे.
 
लग्नानंतर मॅडी आणि रिनाच्या प्रेम कथेमध्ये कसा बदल होतो आणि संसार सुरु झाल्यानंतर प्रेमसंदर्भात त्यांचा भ्रमनिरास कसा होतो अशा वळणाने ही कथा जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दोघांमध्ये निर्माण झालेले वाद सोडवण्यासाठी हे दोघे कसा प्रयत्न करतात यासंदर्भातील ही कथा आहे.