शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (18:16 IST)

आयएसआयला लढाऊ विमानांची तांत्रिक माहिती पुरवणारा गजाआड

HALमध्ये काम करणारा पाकिस्तानी हेर गजाआड करण्यात एटीएसला यश आले आहे. लढाऊ विमानांची माहिती आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे. लढाऊ विमानांची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या हेराला मुंबईत अटक करण्यात आली आहे. हा हेर हिंदुस्तान एरॉनॉटीक्स लिमिटेडचा Hindustan Aeronautics Limited (HAL) कर्मचारी आहे. दीपक शिरसाठ नावाच्या हेराला अटक करण्य़ात आली आहे. 
 
नाशिक एटीएसला या व्यक्तीची माहिती मिळाल्यावर त्याच्यावर सातत्याने पाळत ठेवली होती. मुंबईत या व्यक्तीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याला १० दिवसांची एटीएस कोठडी देण्यात आली आहे. शिरसाठ याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून तीन मोबाइल हँडसेट, पाच सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आली आहेत.