1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (09:26 IST)

सितारे जमीन पर’ या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

amir khan
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून, तो याबद्दल खूप उत्सुक आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आमिरने चित्रपटाची कथा आणि रिलीज डेटची माहिती दिली.
 
‘सितारे जमीन पर’ हा 2007 मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा सिक्वल आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप झाला होता. त्यानंतर आमिरने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती.

आमिर खानला अभिनयापासून दूर राहून जवळपास दीड वर्ष उलटून गेले, पण आता तो पुनरागमन करत आहे. आमिरने त्याच्या प्रोडक्शनच्या ‘लापता लेडीज’च्या स्क्रीनिंग दरम्यान त्याच्या ‘सितारे जमीन पर’या नवीन चित्रपटाविषयी मीडियाला अपडेट दिले. आमिरने सांगितले की, त्याने 1 फेब्रुवारीपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.
 
आमिर खान म्हणाला, ‘माझ्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगला मी गेल्या आठवड्यात सुरुवात केली. आम्ही या वर्षीच्या ख्रिसमसला तो रिलीज करण्याचा प्रयत्न करत आहोत. आशा आहे की तो ख्रिसमसपर्यंत येईल. मी १ फेब्रुवारीपासून माझ्या ‘सितारे जमीन पर’या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor