1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (09:32 IST)

‘पीएम नरेंद्र मोदी'ची याचिका न्यायालयाने फेटाळली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात यावं, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली. मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती अनूप जयराम भामभानी यांच्या खंडपिठाने वकिल सुजीत कुमार सिंग यांची ही याचिका फेटाळून लावली. या याचिकेत वकिल सुजीत कुमार सिंग यांनी आचार संहिता लागू झाल्याने या सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्यात यावे अशी मागणी केली होती. हा सिनेमा येत्या 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. 
 
अभिनेता विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे. विवेक ओबेरॉयने अत्यंत उत्कृष्ट मोदी साकारले आहेत. तो मोदींच्या लूकला पूर्णपणे न्याय देण्यात यशस्वी ठरला आहे. विवेक ओबेरॉयसोबतच या सिनेमात बोमन इराणी, इरीना बहाव, बरखा बिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायणन यांसारखे कलाकार दिसणार आहेत. बोमन इराणी यात रतन टाटा यांच्या भूमिकेत असणार आहेत, तर मनोज जोशी हे अमित शाह यांची भूमिका साकारत आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.