गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (12:29 IST)

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड जिंकणार्‍या खेळाडूला 5 कोटी देणार MP सरकार

मध्य प्रदेश खेळ आणि युवा कल्याण मंत्री जीतू पटवारीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होणार्‍या MPच्या खेळाडूंना आर्थिक मदतीसाठी एक कोटी रुपयांची घोषणा केली आहे. खेळ आणि युवा कल्याण मंत्री पटवारीने आयोजित विशिष्ट खेळ अभिनन्दन कार्यक्रमात भाग घेतला. या प्रसंगी त्यांनी सांगितले की मध्य प्रदेशचा जो कोणी खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेईल, राज्य सरकार त्यांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देईल. 
 
त्यांनी पुढे सांगितले की त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्याला 5 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 3 कोटी आणि कांस्यपदक विजेत्यांना 2 कोटींचा बक्षीस देण्यात येईल. खेळ मंत्री पुढे म्हणाले की जो कोणी खेळाडू राष्ट्रीय पातळीवरील तीन स्पर्धेत सहभागी होईल त्याला सरकारी नोकरी दिली जाईल. या व्यतिरिक्त, राष्ट्रीय पातळीवर खेळणार्‍या खेळाडूंना 5 लाख रुपयांचा पुरस्कारही दिला जाईल. खेळ मंत्री यांनी या प्रसंगी विविध खेळांशी संबंधित मुलांना क्रीडा किट सादर केली.