रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (09:56 IST)

‘पती पत्नी और वो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बहुप्रतिक्षित ‘पती पत्नी और वो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन चिंटू त्यागीच्या भूमिकेत दिसणार आहे तर अनन्या पांडे ‘तपस्या’ आणि भूमि पेडणेकर ‘वेदिका त्रिपाठी’ची भूमिका साकारणार आहे. हा एक रोमॅन्टिक कॉमेडी ड्रामा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच एका तासामध्ये चार लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
 
हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाचा मूळ आशय तोच ठेऊन यामध्ये मॉर्डन ट्विस्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपट ६ डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.