मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (16:13 IST)

मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास, पानिपत ट्रेलर रिलीज मात्र अर्जुन कपूरवर जोरदार टीका

बहुप्रतिक्षित व बहुचर्चित आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. सगळेच पराभव विसरण्यासारखे नसतात. काही पराभव नावाला पराभव असले तरी तुम्हाला अजरामर करुन जातात. अशाच एका पराभवाबद्दलचा इतिहास रुपेरी पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. पानिपतच्या दि. १४ जानेवारी १७६१ या दिवशी लढल्या गेलेल्या युद्धावरचा हा भव्य युद्धपट बनविला आहे. तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अभिनेता संजय दत्तची एण्ट्री अंगावर काटा आणते.
 
चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सनॉन पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. मात्र सर्व पात्र त्यांना न्याय देतांना दिसत असून त्यात अर्जुन कपूरवर सोशल मिडीयावर चांगलीच टीका झाली आहे. गोल मटोल अर्जुन योद्धा दिसतो का ? थोडे जास्त पैसे देवून चांगला अभिनेता का घेतला नाही ? रणवीर किंवा शाहीद कपूर हे यामध्ये शोभले असते अशी टीका आता केली जात आहे.
चित्रपटात इतर कलाकारांनमध्ये पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका दिसत आहेत. अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न गोवारीकरांनी केला असे समोर येते आहे. ‘मराठा, भारतभूमी के वो योद्धा जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है’ यांसारखे दमदार संवाद ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात. त्यामुळे चित्रपट उत्तम असेल असे चित्र सध्या आहे.