बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Modified: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (15:24 IST)

अयोध्येतील जमिनीचा नेमका वाद काय आहे? जाणून घ्या

उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरातील एका जमिनीच्या तुकड्याबद्दल हा वाद आहे. ही जागा राम जन्मभूमी आहे, अशी हिंदूंची धारणा आहे. तर याच जागेवर बाबरी मशीदही होती. मूळ मंदिर तोडून इथं मशीद उभारण्यात आली का, यासंबंधीचा हा वाद आहे.
 
बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 साली तोडण्यात आली. यानंतर अलाहबाद उच्च न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला.
 
30 सप्टेंबर 2010 साली या प्रकरणी निकाल देण्यात आला. यावेळी अलाहाबादच्या उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींनी अयोध्येतील 2.77 एकरांची जमीन तीन भागांत विभागली. यातील हिंदू महासभेला रामभूमी म्हणून 1/3 भाग, सुन्नी वक्फ बोर्डाला 1/3 भाग आणि निर्मोही आखाड्याला 1/3 भाग देण्याचे आदेश देण्यात आले.