1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (15:22 IST)

अयोध्या प्रकरणी 17 ऑक्टोबर तारीख महत्त्वाची

The date of October 17 in the Ayodhya case matters
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. रामजन्मभूमीच्या वादावर कोर्टाचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा शुक्रवारी केली.
 
अयोध्येची जागा कुणाची, यावरून ही केस कोर्टात सुरू आहे. दोन्ही बाजूंचे वाद-प्रतिवाद येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
 
अयोध्येची ती वादग्रस्त जागा नेमकी कोणाची, याचा छडा लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दावा करण्यात आला. गेल्या मे महिन्यापासून अयोध्या प्रकरणावर कोर्टात नियमित सुनावणी होत आहे.