शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 29 मे 2022 (12:05 IST)

आमिर खानचा पाणीपुरी खातानाचा हा मजेदार व्हिडिओ व्हायरल

पाणीपुरी बघून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटत. पाणीपुरी खाण्याचा मोह बॉलिवूड परफेक्शनिस्ट म्हणवला जाणारा आमिर खान देखील आवरू शकला नाही. आमिरचा आपल्या चाहत्यांच्या मध्ये पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज म्हणजेच 29 मे रोजी आमिरच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे, अशा परिस्थितीत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण या सगळ्या दरम्यान आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता त्याच्या चाहत्यांमध्ये उभा राहून पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. 
 
व्हिडिओ पहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की आमिर खान त्याच्या चाहत्यांनी घेरला आहे आणि या दरम्यान अभिनेता पाणीपुरी खाण्याचा आनंद घेत आहे.

या व्हिडिओमध्ये आमिर गर्दीत उभे राहून पाणीपुरी खात आहे. आमिरच्या हातात पाणीपुरीची प्लेट आहे. आणि अभिनेता पाणीपुरीचा आस्वाद घेत खात आहे. पांढऱ्या टी-शर्ट आणि गुलाबी शर्टमध्ये आमिर नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर दिसत आहे आणि तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आमिर खानचा हा खास प्रसंग कॅमेऱ्यात कैद करत आहेत. सोशल मीडियावर चाहतेही आमिरच्या या स्टाइलचे खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खूप पसंत केला जात आहे.