शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 (14:09 IST)

सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, 5 कोटींची मागणी

Salman khan threat: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आणखी एक धमकी मिळाली आहे. त्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे 5कोटी रुपयांची मागणी केली आहे. पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असून सलमान खानची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
 
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर हा धमकीचा संदेश आला होता आणि मध्यरात्री एका अधिकाऱ्याने हा संदेश पाहिला. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा केला आहे.
 
या मेसेजमध्ये म्हटले आहे की, 'सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या (बिष्णोई समाजाच्या) मंदिरात येऊन माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये द्यावेत. जर त्याने हे केले नाही तर त्याला ठार करू, आमची टोळी अजूनही सक्रिय आहे.
 
लॉरेन्स बिश्नोई हत्येचा प्रयत्न, खंडणीसह विविध आरोपांखाली तुरुंगात आहे. 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे या टोळीचा हात असल्याचे बोलले जात आहे. बाबा सिद्दीकी सलमान खानच्या जवळचा होता आणि त्याच्या हत्येसाठी सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
Edited By - Priya Dixit