शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (11:23 IST)

अभिनेता सलमान खानला दोन कोटी रुपये मागत पुन्हा जीवे मारण्याची धमकी

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली असून मंगळवारी वाहतूक नियंत्रणाला अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचा संदेश आला. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे.   
 
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने पैसे न मिळाल्यास तो सलमान खानला ठार करेल, असेही सांगितले होते. अलीकडच्या काळात सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहे.  
 
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या 14 दिवसांत 3 वेळेस जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. पहिली धमकी 18 ऑक्टोबर रोजी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये संदेशकर्त्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले होते.
 
Edited By- Dhanashri Naik