शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2017 (12:02 IST)

'डॅडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अभिनेता अर्जून रामपाल याच्या 'डॅडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटात अरुण गवळीचं कुटुंब, गुन्हेगारी, राजकारण आणि त्यानंतर न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा सर्व काही दाखवण्यात येणार आहे. अभिनेता अर्जून रामपाल मुख्य भुमिकेत असून अरुण गवळी साकारताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये अरुण गवळी अंडरवलर्डमध्ये येण्यापासून ते न्यायालयाकडून शिक्षा होईपर्यंत सर्व काही दाखवण्यात आलं आहे. अरुण गवळीची ओळख असलेला पांढरा कुर्ता पायजमा आणि गांधी टोपीही अर्जुन रामपालने घातली आहे.