बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (17:38 IST)

टीव्ही अभिनेत्याने गोळीबार करून केला तरुणाचा निर्घृण खून, पोलिसांनी ताब्यात घेतले

arrest
उत्तरप्रदेशातील बिजनौरमध्ये टीव्ही अभिनेता भूपिंदर सिंगला गोविंद हत्या प्रकरणात दोघांसहअटक करण्यात आली .बाधापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुआखेडा खडरी गावात रविवारी दुपारी कड्यावर उभ्या असलेल्या वादग्रस्त झाडाच्या छाटणीवरून झालेल्या गोळीबारात पोलिसांनी टीव्हीअभिनेता  आणि त्याच्या एका नोकराला अटक केली आहे. मृताच्या काकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंग याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली असून दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
 
टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंह यांचे बिजनौरच्या बधापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुआनखेडा खादरी गावाला लागून शेरगड नावाचे फार्म हाऊस आहे. गुरदीप सिंग यांची फार्म हाऊसजवळ शेतजमीन आहे. जमिनीच्या कड्यावर उभ्या असलेल्या निलगिरीच्या झाडावरून दोघांमध्ये वाद सुरू आहे. रविवारी दुपारी वादग्रस्त झाड तोडण्यावरून वाद झाला. त्यानंतर अभिनेत्याने अंदाधुंद गोळीबार केला.

या गोळीबारात गुरदीप सिंग यांचा मुलगा गोविंद सिंग(22) वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर गुरदीप यांची पत्नी मीराबाई आणि मुलगा बुटासिंग हे गंभीररीत्या जखमी झाले. गुरदीप यांच्या भावाने तक्रारी वरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अभिनेता भूपेंद्र, त्यांचे नौकर, ज्ञान सिंग, जीवन सिंग, आणि गुर्जर सिंग यांचावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 

टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंग यांनी काला टीका, एक थी हसीना, कार्तिक पौर्णिमा या मालिकेत काम केले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit