बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (15:30 IST)

छत्रपती संभाजी नगर येथे अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केला

rape
महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका गावात घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहे.विलास विनायक मुळे आणि संजय मछिंद्र मोहिते असे या आरोपींची नावे आहे.  

पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकते आरोपी हे मुलीच्या घराच्या मागील भागात राहतात. ते दोघे काही दिवसांपासून मुलीच्या घराच्या समोरून जाताना तिला पाहून हसायचे. दिवाळीच्या एकदिवसापूर्वी आरोपी संजय हा मुलीच्या घरी आला आणि त्याने तिला बळजबरी एका झोपडीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. तसेच घडलेले प्रकार कोठे ही सांगायचे नाही नाहीतर ठार मारेन अशी धमकी दिली. मुलीने भीतीपोटी कोणालाही संगितले नाही. 

2 डिसेंबर रोजी विलास मुळे पीडित मुलीच्या घरी ती एकटी असताना आला आणि संजयच्या शेतातून मोसंबी आणायला जाऊ असे म्हणून मुलीला शेतात नेले आणि तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर मुलगी घरी परत जात असताना तिच्या भावाने कुठे निघाली असे विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार भावाला सांगितलं नंतर मुलीला घेऊन कुटुंबीय पोलीस गेले. तिथे तिने आरोपींच्या विरोधात तक्रार नोंदवली. 

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी केली जात आहे. या साठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्च्यात पीडित मुलीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, तिला शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे,मुलीला शासकीय नौकरी देण्यात यावी, आरोपीना कठोर दंड देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit