1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 सप्टेंबर 2023 (13:35 IST)

छत्रपती संभाजी नगर : प्रेम संबंधावरून भावांनी केली बहिणीची हत्या

murder
छत्रपती संभाजी नगरात दोन सख्ख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना छत्रपती संभाजी नगरच्या सोयगाव तालुक्यात राक्षा शिवारात घडली आहे .दोन सक्ख्या भावांनी आपल्या आई वडिलांच्या सांगण्यावरून निर्घृण हत्या केली. चंद्रकला धोंडिबा बावस्कर असे या मयत महिलेचे नाव आहे.  
 
या प्रकरणी महिलेचा भाऊ कृष्णा धोंडिबा बावस्कर, शिवाजी धोंडिबा बावस्कर, आई शेवंताबाई धोंडिबा बावस्कर आणि वडील धोंडिबा सांडू बावस्कर यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मयत चंद्रकला बावस्कर यांचे राक्षा शिवारात राहणारे शमीम शाह कासम शाह यांच्याशी प्रेम संबंध असल्याचा संशय तिच्या आई वडील आणि भावांना  होता. शनिवारी शमीम शाह हे शेतात काम करत असताना चंद्रकला बावस्कर तिथे आल्या आणि त्यांना माझे भाऊ मला ठार मारण्यासाठी माझा पाठलाग करत आहे मला वाचवा आणि लपवा असे म्हणाली. त्यांनी चंद्र्कलाला बकऱ्याच्या शेडमध्ये लपवले. नंतर तिच्या भावांनी तिचा शोध केल्यावर ती बकऱ्याच्या शेड मध्ये लपलेली दिसली. 
 
त्यांनी तील मारहाण केली आणि तिच्यावर कुऱ्हाडयाने वार केले. डोक्यात वार केल्यावर ती जमिनीवर कोसळली. तेवढ्यात तिचे आईवडील आले आणि त्यांनी भावांना तिला जिवंत सोडू नका असे सांगितले शमीमने आपला जीव वाचवत पोलीस ठाण्यात जाऊन घडलेले सर्व सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मयत महिलेच्या आई वडील आणि दोन्ही भावांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रेम संबंधावरून हत्या केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. 
 
Edited by - Priya Dixit