1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (21:12 IST)

काय सांगता, मनोज नाव असेल तर या हॉटेल मध्ये मोफत जेवण मिळणार

manoj jarange
मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनासाठी उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील आंदोलन करत आहे. मराठा समाज जरांगे यांना पाठिंबा देत आहे. राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. एका मराठा बांधवाने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. 
 
आपल्या कडून जरांगे पाटीलांना समर्थन देण्यासाठी  मनोज नावाच्या व्यक्तींना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. बाळा साहेब भोजने असा या हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांचे हॉटेल धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात  पाचोड येथे असून अमृत असे त्यांच्या हॉटेलचे नाव आहे. भोजने यांनी आरक्षणाला समर्थन देण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमात मनोज नावाच्या व्यक्तीला आधार कार्ड दाखवल्यावर 23 ऑक्टोबर पासून 1 नोव्हेंबर पर्यंत मोफत जेवण दिले जाणार आहे. या मुदतीत वाढ करून आता 15 नोव्हेंबर पर्यंत मोफत जेवण दिले जाणार आहे. मनोज नावाच्या व्यक्तीने जेवायला येताना सोबत आधारकार्ड जवळ बाळगावे अशी अट ठेवण्यात आली आहे. 
 
Edited by - Priya Dixit