सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (18:07 IST)

Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्र घेण्यास 96 कुळी मराठ्यांचा विरोध

Maratha Reservation
Maratha Reservation : सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. कुणबी समाजाच्या काही जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे राज्य सरकारने निश्चित केले असून   रत्नागिरीत मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा निर्णय  माळनाकाच्या मराठा भवनात रत्नागिरी तालुका समाजाच्या बैठकीत घेण्यात आला असून या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला मात्र कुणबी प्रमाण पत्र घेण्यास नकार दिला. आम्ही 96 कुळी मराठा आहोत आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको. म्हणत विरोध दर्शविला. 
 
मराठा समाजाने एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची गरज असल्याचे बैठकीत सांगितले तसेच या साठी संघटन स्थापित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चे नंतर एकमताने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.   

या साठी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून समाजासाठी वेळ देणाऱ्या आणि कार्य करणाऱ्या संघटनेला कार्यकारिणीवर घेण्यात येणार असून हे संघटन गावा-गावात जाऊन जण जागृती करणार आहे. यावेळी आप्पा देसाई, संतोष सावंत, केशवराव इंदुलकर, राकेश नलावडे, सुधीर भोसले, भाऊ देसाई, कौस्तुभ सावंत, आदी उपस्थित होते.
 





Edited by - Priya Dixit