शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (13:51 IST)

Manoj Jarange Patil in hospitalize मनोज जरांगे पाटील रुग्णालयात

Manoj Jarange Patil in hospitalize मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण अस्त्र उगारले होते. सरकारच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळाने आश्वासनानंतर सलग नऊ दिवसांच्या कालावधीने जरांगेंनी आपले उपोषण आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, या नऊ दिवसांत जरांगेंची प्रकृती खालवली होती, त्यांना बोलताना त्रास जाणवत होता. उपोषण स्थगितीनंतर जरांगे छत्रपति संभाजीनगर येथे गॅलेक्सी दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेत आहेत. डॉ. चावरे यांनी जरांगेच्या प्रकृतीबाबत माहिती दिली असून सांगितले आहे की  यांच्या किडनी अन् लिव्हरवर सूज आल्याचे सांगितले.
 
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतले. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरु होते. उपोषण सुरु असताना त्यांनी वैद्यकीय उपचार करुन घेण्यास नकार दिला होता.