मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (13:06 IST)

उडाण फेम अभिनेत्री कविता चौधरी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

kavita chaudhari death
social media
उडाण मालिका फेम अभिनेत्री, निर्मिती कविता चौधरी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाला. त्यांना मालिका उडाण मुळे लोकप्रियता मिळाली होती. त्यांनी मालिकेत आयपीएस अधिकारी कल्याणी सिंगची भूमिका साकारली होती.ही मालिका पहिला डीजीपी महिला कांचन चौधरी यांची कथा होती. कांचन चौधरी पोलीस अधिकारी होत्या. त्या पोलीस अधिकारी कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या धाकट्या बहीण होत्या. कांचन चौधरी यांचे निधन झालं आहे. 

कविता चौधरी यांनी उडाण मालिकेत स्वतः कांचन चौधरी यांची भूमिका साकारली होती. या मालिकेत या पोलीस अधिकारी कल्याणी सिंह बनल्या होत्या. त्यांनी  युअर ऑनर  आणि आयपपीएस डायरीज  हे दोन टेलिव्हिजनचे शो बनवले होते.  त्यांना उडाण या मालिकेपासून लोकप्रियता मिळाली होती. 

त्यांनी अमृतसर येथे अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. त्या 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.एकाने लिहिले आहे त्या आमच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. उडाण मालिकेतील त्यांची भूमिका उत्कृष्ट होती.  
 
 Edited by - Priya Dixit