रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (15:07 IST)

प्राईम व्हिडीओच्या वतीने 'अनपॉज्ड: नया सफर' ट्रेलरचे अनावरण!

नागराज मंजुळे दिग्दर्शित - 'वैकुंठ' लघुपटाचा या अँथॉलॉजीमध्ये समावेश
 
मुंबई,15 जानेवारी, 2022: प्राईम व्हीडिओ’च्या वतीने आज हिंदी कथांचा संग्रह असलेला अनपॉज्ड: नया सफर ‘चा लक्षवेधी ट्रेलर लॉन्च करण्यात आला. याचा प्रीमियर जगभर 21 जानेवारी 2022 रोजी 240 हून अधिक देश-प्रदेशात होणार आहे. अनपॉज्ड ‘च्या पहिल्या आवृत्तीला भरभरून प्रतिसाद मिळाला असून 2020 मध्ये प्रीमियर झाला होता. महासाथीने प्रत्येकाच्या जीवनात आव्हाने निर्माण केली, प्रत्येकाची प्रतिसाद देण्याची स्वत: निराळी पद्धत असते. अमेझॉन ओरिजनलच्या दुसऱ्या आवृत्तीत अभिनव स्वरूपाच्या पाच हिंदी शॉर्ट फिल्म्सचा समावेश असेल. नवीन वर्षाचे स्वागत करताना सकारात्मक बाजूंवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  
 
कसदार अभिनयाकरिता प्रसिद्ध असलेले साकीब सलीम, श्रेया धन्वंतरी, नीना कुलकर्णी आणि प्रियांशू पेनयुली व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळतील. अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी प्रकाशाचा साक्षात्कार होतो, हे हृदयस्पर्शी संस्मरण अनपॉज्ड: नया सफर ‘मधून दिल्याचे दिसते. मालिकेचा ट्रेलर सुंदर आहे. प्रेम आणि सकारात्मकतेत गुंफलेल्या कथा, नव्या वर्षाची नवी सुरुवात करण्याची उमेद आपल्याला देऊन जातात.  
 
कथामालिकेतील शॉर्ट फिल्म्समध्ये समावेश आहे-
 
• वैकुंठ, नागराज मंजुळे दिग्दर्शित; अर्जुन करचे आणि हनुमंत भंडारी अभिनीत.
 
• तीन तिघाडा, दिग्दर्शन- रुचिर अरुण; साकीब सलीम, आशीष वर्मा आणि सॅम मोहन अभिनीत.
 
• द कपल, दिग्दर्शन- नुपूर अस्थाना; श्रेया धन्वंतरी आणि प्रियांशू पेनयुली अभिनीत.
 
• गोंद के लड्डू, शिखा माकन दिग्दर्शित; दर्शना राजेंद्र आणि लक्षवीर सिंग सरन अभिनीत.
 
• वॉर रूम, अयप्पा केएम दिग्दर्शित; गीतांजली कुलकर्णी, रसिका आगाशे, पुरनंदन वांधेकर आणि शर्वरी देशपांडे अभिनीत.
 
वैकुंठचे दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले की, “अनपॉज्ड: नया सफर कथा संग्रह मालिकेच्या प्रत्येक कलाकृतीत अनेक भावनिक छटा उलगडल्या आहेत. वैकुंठ दु:ख आणि आशेचे संतुलन राखते. त्यात अनिश्चितता खच्चून भरली आहे. एक टीम म्हणून मला अभिमान वाटतो आणि या कलाकृतीचा भाग होता आले, हे माझे भाग्य मानतो. प्रेक्षकांच्या मनात ही मालिका दीर्घकाळ घर करेल, ही आशा बाळगतो.”
 
तीन तिघाडाचे दिग्दर्शक रुचिर अरुण म्हणाले की,“अनपॉज्ड: नया सफर मधील कथा प्रवाही आहेत, त्यात भावनांची सरमिसळ असून या संग्रहांची फिल्म प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तीन तिघाडा सोबत आमचा भर मानवी भावना अधोरेखित करण्यावर असून आपल्यापैकी प्रत्येकाला महासाथीचा तडाखा वादळाप्रमाणे बसलेला आहे. या सिनेमाचे निवेदन अभिनव असून स्क्रीनवर कलाकारांचा आविष्कार अफलातून झाला आहे. प्रेक्षक वर्गाला आमचा हा प्रयत्न आवडेल ही आशा.”
 
नुपूर अस्थाना, द कपलचे दिग्दर्शक सांगतात की, “महासाथीत नोकरी-धंद्यावर मोठा परिणाम झाल्याने, हातात येणारे उत्पन्न रोडावले. अनिश्चिततेने हताश केले. व्यावसायिक स्तरावरील बदलामुळे जोडीदारांत निर्माण झालेला भावनिक तणाव आणि गुंतागुंत द कपल’मधून अधोरेखित होते. सत्य परिस्थितीला तोंड देताना दोन व्यक्तींवरील नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो, हे दाखवण्यात आले आहे. कथामालिकेच्या पहिल्या आवृत्तीने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते आणि अनपॉज्ड: नया सफरवर प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव होईल याची आशा वाटते.  
 
गोंद के लड्डू’ च्या दिग्दर्शिका शिखा माकन म्हणाल्या की, “महासाथीचा परिणाम प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे झाला आहे. अशा प्रसंगाची अपेक्षा नव्हती. ही अचानक उद्भवलेली स्थिति होती. आपण जिवलगांपासून दूर होतो, चिंतेत होतो. प्रत्येकाशी जोडून राहण्याची त्यांची काळजी घेण्याचे मार्ग शोधत होतो. गोंद के लड्डू ‘मधून मानवी बंध उलगडले असून कथा वळण घेणाऱ्या आहेत. ही फिल्म छायाचित्रित करण्याचा अनुभव समृद्ध होता. अफलातून कलाकारांनी कथानके जिवंत केली असून निवेदन आशयघन आहे. प्रेक्षकांना भावनिक स्तरावर नक्कीच कथेशी नाळ जोडता येईल."
 
वॉर रूम ‘चे दिग्दर्शक अय्यप्पा केएम म्हणाले की, “वॉर रूम’मध्ये फ्रंटलायनर वर्करनी महासाथीसारख्या असुलभ स्थितीत अनुभवलेली गंभीर अवस्था दर्शवली आहे. ही कथा गुंतवून ठेवणारी आहे. मानवी भावनेची निराळी बाजू या कथेतून पुढे येते आणि एक सुंदर कल्पना प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.”