मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (15:32 IST)

उर्फी जावेदने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर व्हिडीओ बनवला

उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर उर्फीने इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्यांना उत्तर दिलं होतं.
 
चित्रा वाघ यांनी “थोबडवेन” असं म्हटल्यानंतर उर्फीने दिल्लीतील अपघाताचा व्हिडीओ शेअर करत भाजपाशी संबंधित असलेल्या आरोपीवर कारवाई करणार का?, असा सवाल त्यांना केला होता. त्यानंतर उर्फीने चित्र-विचित्र बिकिनीमधील व्हिडीओही तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला होता. आता उर्फीने पुन्हा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीने भगव्या रंगाचे अतरंगी कपडे परिधान केले आहेत. ‘पठाण’ चित्रपटातील वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर तिने व्हिडीओ बनवला आहे. उर्फीचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor