शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (15:30 IST)

वरुण धवन वेस्टिब्युलर हायपोफंक्शन डिसऑर्डरने ग्रस्त

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी 'भेडिया' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सध्या वरुण चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान वरुणने स्वतःबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. वरुणने सांगितले की, तो एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे.
 
वरुण धवनने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. वरुणने सांगितले की त्याला वेस्टिब्युलर हायपोफंक्शन डिसऑर्डरने ग्रासले आहे. या आजारात व्यक्ती शरीराचा तोल गमावून बसते. साथीच्या रोगानंतर ही समस्या त्याला सर्वात जास्त आली आहे. त्याने सांगितले की महामारीनंतर जेव्हा गोष्टी हळूहळू उघडू लागल्या तेव्हा वरुण धवनला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. स्वतःला पुढे नेण्यासाठी दबावाखाली काम करण्यासाठी स्वत:ला पुढे ढकलावे लागले. इच्छा नसताना वरुण धवनला कामातून ब्रेक घ्यावा लागला.
 
वरुण धवनने पुढे सांगितले की, जेव्हा त्याला आपल्या आजराबद्दल कळले तेव्हा तो खूप निराश झाला होता. त्याला इतकं जाणवत होतं की तो विचारही करू शकत नव्हता. अशात स्वत: ला पुढे करणे खूप आव्हानात्मक होते. या आजारात बॅलन्स सिस्टीम बिघडते पण मी जास्त मेहनत केली… या शर्यतीत आपण नुसतेच धावत आहोत, पण कुणी विचारत नाही का म्हणून? वरुणने सांगितले की, या आजारामुळे 'जुग जुग जियो' या चित्रपटासाठी त्याच्यावर इतके दडपण आले की मला असे वाटू लागले की मी कोणत्याही निवडणुकीत भाग घेत तर नाहीये. मला माहित नाही की मी स्वतःवर इतका ताण आणि दबाव का आणला, पण मी तसे केले.
 
त्याने म्हटले की मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक उद्देश असतो. यामुळेच आम्ही मेहनत घेत आहोत. मी माझ्या जीवनाचा उद्देश शोधत आहे आणि मला आशा आहे की इतरांना देखील त्यांचा उद्देश कधी ना कधी सापडेल.
 
वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे काय?
वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक विकार आहे जो आतील कानात होतो. वास्तविक मानवी शरीरात एक वेस्टिब्युलर प्रणाली असते, जी कान, डोळे आणि स्नायू यांचे संतुलन राखते. एखाद्याला हा विकार झाला तर रुग्णाच्या मेंदूला संदेश पोहोचवण्यात अडचण येते, त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. vestibular hypofunction या आजारात शरीराचे संतुलन बिघडू लागते. अशात तज्ज्ञांच्या मदतीने आणि योग्य उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो.