शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (07:52 IST)

Veena Kapoor राजकुमारसोबत झळकणार वीणा कपूर

निर्माता अनुभव सिन्हाने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनुभव सिन्हा आता स्वत:च्या बॅनर अंतर्गत एका नव्या सीरिजची निर्मिती करत आहे. अनुभव सिन्हा सध्या चार प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. यातील एका प्रोजेक्टमध्ये राजकुमार राव अन् वाणी कपूर असल्याचे समजते.
 
अनुभव सिन्हा ‘बचपन का प्यार’ या नावाने एका छोट्या शहरातील प्रेमकहाणी सादर करणार आहेत. यात राजकुमार राव अन् वाणी  कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. लखनौची पार्श्वभूमी असलेल्या या कहाणीवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व धर बडगइयां करणार आहे. अपूर्वने यापूर्वी चमन बहार या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण चालू महिन्यात सुरू होणार आहे.
 
या चित्रपटाद्वारे वाणी कपूर पहिल्यांदाच अनुभव सिन्हासोबत काम करणार आहे. तर राजकुमारने यापूर्वी दोनवेळा अनुभव सिन्हांसोबत काम केले आहे. अनुभव सिन्हा आणखी एका चित्रपटाची निर्मिती करत असून याचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा करणार आहेत. राजकुमार रावने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तर वाणी कपूर अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली असली तरीही स्वत:चे स्थान अद्याप निर्माण करता आलेले नाही. वाणीसाठी नवा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे