ज्येष्ठ अभिनेत्री मीनू मुमताज यांचे निधन, कॅनडात घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री मीनू मुमताज यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. कॅनडात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती त्यांचे भाऊ अन्वर अली यांनी दिली आहे. मीनू कॉमेडियन मेहमूदची बहीण होती.
मीनू मुमताज यांचा जन्म 26 एप्रिल 1942 रोजी झाला. त्यांनी लहानपणापासूनच नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. मेहमूदचे संपूर्ण कुटुंब चित्रपटांशी जोडले गेले होते, त्यामुळे मीनूही चित्रपटांमध्ये झळकल्या . त्यांना देविका राणीने चित्रपटांमध्ये आणले होते. देविका राणीने मीनूला बॉम्बे टॉकीजमध्ये डान्सर म्हणून नियुक्त केले.
मीनूने 1955 मध्ये घर घर में दिवाळी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जरी मीनूला या चित्रपटातून फारसे यश मिळाले नाही. त्यांना खरी ओळख मिळाली ती 'सखी हातीम' चित्रपटातून. यामध्ये त्यांनी जलपरीची भूमिका साकारली होती.
मीनू मुमताज यांनी आपले सक्खे भाऊ मेहमूदसोबत 1958 च्या हावडा ब्रिज चित्रपटात ऑन-स्क्रीन रोमान्स केले होते. पडद्यावर भाऊ -बहिणींचा रोमान्स पाहून प्रेक्षक खूपच संतापले. मीनूने पडद्यावर कॉमेडी केली आणि बाजूच्या भूमिकांसह बरेच नाव मिळवले.
मीनू मुमताजने 1963 मध्ये दिग्दर्शक एस अली अकबरशी लग्न केले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. मीनू बऱ्याच काळापासून कॅनडात वास्तव्यास होत्या.