शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (13:32 IST)

ज्येष्ठ अभिनेत्रीचा झोपेतच अंतिम श्वास

सिनेप्रेमींसाठी धक्कादायक बातमी म्हणजे ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री जयंती यांचे बंगळुरूतील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. 
 
जयंती यांचा मुलगा कृष्ण कुमार यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जयंती यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. केवळ कन्नडच नाही तर इतर सहा भाषांमधील चित्रपटांमध्येही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. 60 ते 80 च्या दशकात जयंती यांनी जेमिनी गणेशन, एमजीआर आणि जयललिता या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले होते.
 
जयंती यांचा जन्म 6 जानेवरी 1945 रोजी कर्नाटकमध्ये झाला होता आणि बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यांनी अभिनय, निर्मिती आणि गायन क्षेत्रातही काम केले होते. 
 
जयंती यांच्या निधनावर कन्नड चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी ट्विट केले, 'जयंती यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान अमूल्य आहे. त्यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.' 
 
तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तीन बहुरानियां, तुमसे अच्छा कौन है आणि गुंडा या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. 
 
जयंती यांना सात वेळा कर्नाटक राज्य फिल्म पुरस्कार आणि दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारने गौरविण्यात आले होते. 2018 साली जयंती यांच्या निधनाची अफवा उडाली होती. तेव्हा खुद्द जयंती यांनी समोर येत आपण ठणठणीत असल्याचं सांगितलं होतं.